देवाचं राज्य—नेमकं काय आहे?
देवाचं राज्य यावं यासाठी आज बरेच लोक प्रार्थना करतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की देवाचं राज्य म्हणजे नेमकं काय आणि ते आपल्यासाठी काय करेल?
बायबल काय सांगतं यावर विचार करा:
देवाचं राज्य काय आहे?
हे एक स्वर्गीय सरकार आहे. आणि या राज्याचा राजा येशू ख्रिस्त आहे.—यशया ९:६, ७; मत्तय ५:३; लूक १:३१-३३.
देवाचं राज्य कोणकोणत्या गोष्टी करेल?
हे राज्य सर्व वाईट गोष्टींचा अंत करेल आणि लोकांसाठी पृथ्वीवर कायम टिकणारी शांती आणेल.—दानीएल २:४४; मत्तय ६:१०.
आधी देवाचं राज्य मिळवण्याचा प्रयत्न करा, याचा काय अर्थ होतो?
याचा अर्थ असा होतो की आपण देवाच्या राज्याची बाजू घेतली पाहिजे. आणि असा भरवसा ठेवला पाहिजे की फक्त हेच राज्य पृथ्वीसाठी असलेला देवाचा उद्देश पूर्ण करेल.—मत्तय ६:३३; १३:४४.