यहोवाच्या साक्षीदारांमध्ये दशमांश देतात का?
नाही. यहोवाच्या साक्षीदारांमध्ये दशमांश देत नाहीत. आमचे काम स्वच्छेने दिलेल्या अनुदानांकरवी चालवले जाते. आणि जो अनुदान देतो त्याचे नाव जाहीर केले जात नाही. दशमांश म्हणजे काय? आणि यहोवाच्या साक्षीदारांमध्ये दशमांश का देत नाहीत?
दशमांश देण्याबद्दलची म्हणजे एखाद्याच्या संपत्तीचा दहावा भाग देण्याबद्दलची आज्ञा, इस्राएल राष्ट्राला दिलेल्या नियमशास्त्रात होती. पण ही आज्ञा तसेच “दशमांश घेण्याची आज्ञा” ख्रिश्चनांना लागू होत नाही हे बायबलमधील वचनांवरून स्पष्ट कळते.—इब्री लोकांस ७:५, १८; कलस्सैकर २:१३, १४.
दशमांश आणि अर्पणे देण्याऐवजी यहोवाचे साक्षीदार आरंभीच्या ख्रिश्चनांचे अनुकरण करतात व दोन मार्गांनी त्यांची सेवा पूर्ण करतात: पगार न घेता प्रचाराचे व शिकवण्याचे काम करतात आणि स्वच्छेने अनुदान देतात.
अशा प्रकारे आम्ही बायबलमध्ये ख्रिश्चनांना दिलेल्या आज्ञेचे पालन करतो: “प्रत्येकाने आपआपल्या मनात ठरवल्याप्रमाणे द्यावे; दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये; कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो.”—२ करिंथकर ९:७.

