व्हिडिओ पाहण्यासाठी

दुसऱ्या मेन्यूवर जाण्यासाठी

यहोवाचे साक्षीदार

मराठी

विपत्ती मदत कार्यात दिसणारे प्रेम

विपत्ती मदत कार्यात दिसणारे प्रेम

यहोवाचे साक्षीदार आपल्या सहबांधवांना व इतरांना गरज असते तेव्हा त्यांच्या मदतीला धावून जातात. हे सर्व ते प्रेमापोटी करतात कारण प्रेम हे खऱ्या ख्रिश्चनांचे ओळख चिन्ह आहे.—योहान १३:३५.

सन २०१२ च्या मध्यापर्यंत एक वर्षापेक्षा थोड्या अधिक काळापासून देण्यात आलेल्या मदतीचा हा संक्षिप्त अहवाल आहे. आमच्या मदत कार्यात सहसा दिल्या जाणाऱ्या आध्यात्मिक तसेच भावनिक साहाय्याचा पुढील अनुभवांमध्ये उल्लेख करण्यात आलेला नाही. आमच्या शाखा कार्यालयाने नेमलेल्या विपत्ती मदत कार्य समित्यांनी बरीच मदत केली. तसेच, स्थानिक मंडळ्यांनीदेखील नियमित रीत्या या मदत कार्यात सहभाग घेतला.

जपान

जपान: ११ मार्च २०११ रोजी, उत्तर जपानमध्ये आलेला भूकंप व त्यामुळे आलेल्या सुनामीमुळे, हजारो लोकांचे जीवन विस्कळीत झाले. संपूर्ण जगभरातील यहोवाच्या साक्षीदारांनी मोठ्या मनाने पैशांची मदत केली. घरे पुन्हा उभी करण्यासाठी त्यांनी आपल्या कौशल्यांचा, साधनसंपत्तीचा उपयोग केला. जपानमधील भूकंपानंतरच्या मदत कार्याबद्दलचा आमचा व्हिडिओ पाहा.

ब्राझील: पुरामुळे व दरडी कोसळल्यामुळे हजारो लोकांना आपल्या प्राणांस मुकावे लागले. यहोवाचे साक्षीदार लगेच कामाला लागले. त्यांनी, लवकर खराब न होणारी ४२ टन अन्नसामग्री, पाण्याच्या २०,००० बाटल्या, १० टन कपडालत्ता, ५ टन साफसफाईची सामग्री आणि औषधे व इतर गोष्टी पाठवल्या.

काँगो (ब्राझावील): येथील एका शस्त्रसाठ्यात स्फोट झाला तेव्हा ४ यहोवाच्या साक्षीदारांची घरे पार उद्ध्वस्त झाली आणि २८ साक्षीदारांच्या घरांचे नुकसान झाले. यांच्यासाठी लगेच अन्न व वस्त्र पाठवण्यात आले आणि स्थानिक साक्षीदारांनी त्यांना आपल्या घरात राहायला घेतले.

काँगो (किन्शासा): कॉलेराची साथ पसरली होती तेव्हा या आजाराला बळी पडलेल्यांना औषधांचे वाटप करण्यात आले. ढगफुटीमुळे आलेल्या पुरात ज्यांचे नुकसान झाले होते त्यांना कपडालत्ता पुरवण्यात आला. निर्वासितांच्या छावणीत असलेल्यांना औषधे, बी-बियाणे व भरपूर कपडालत्ता देण्यात आला.

व्हेनिझुएला: जोराच्या पावसामुळे पूर आले, दरडी कोसळल्या. विपत्ती मदत कार्य समित्यांनी २८८ विपत्तीग्रस्त साक्षीदारांना मदत केली. ५० पेक्षा जास्त नवीन घरे बांधण्यात आली. शिवाय, वॅलेंसिया तलावातील पाण्याची पातळी वाढत असल्यामुळे ज्यांच्या घरांना धोका आहे त्यांनाही ते मदत करत आहेत.

फिलिपाईन्स

फिलिपाईन्स: चक्रीवादळांमुळे देशातील अनेक भागांत पूर आले. तेथील शाखेने पुरग्रस्तांना अन्नसामग्री व कपडालत्ता पाठवला आणि स्थानिक साक्षीदारांनी, पुराचे पाणी ओसरल्यावर घरे स्वच्छ करण्यास मदत केली.

कॅनडा: अल्बर्टामध्ये एका जंगलात मोठ्या प्रमाणावर आग लागली होती तेव्हा, आग लागलेल्या ठिकाणी राहत असलेल्यांना मदत करण्यासाठी स्लेव्ह लेक मंडळीला इतर ठिकाणांच्या साक्षीदारांकडून बऱ्यापैकी अनुदान मिळाले. पण तिथे इतके पैसे खर्च करण्याची गरज नसल्यामुळे, या मंडळीने उरलेला अर्धाधिक पैसा, जगातील इतर भागातील विपत्तीग्रस्त बांधवांसाठी पाठवला.

कोट डी आयव्हरी: देशातील एका युद्धाच्या आधी, दरम्यान व नंतर गरजूंसाठी सामानसुमान व औषधे देण्यात आली व त्यांच्या राहण्याचीदेखील सोय करण्यात आली.

फिजी: मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात, १९२ साक्षीदारांची शेते पाण्याखाली गेली. या शेतांवरच त्यांचा उदरनिर्वाह चालला होता. पण त्यांच्यासाठी अन्नसामग्री पाठवण्यात आली.

घाना: देशातील पूर्वेकडील भागातील पूरग्रस्तांना अन्नसामग्री, बी-बियाणे व घरांसाठी सामान पाठवण्यात आले.

अमेरिका: चक्रीवादळाने तीन राज्यातील ६६ साक्षीदारांच्या घरांची नासधूस केली. आणि १२ साक्षीदारांची घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. बहुतेकांनी आपल्या घरांचा विमा उतरवला होता तरीपण, यांना बांधकाम साहित्य आणण्यासाठी अनुदान देण्यात आले.

अर्जेंटिना: देशाच्या दक्षिण भागात ज्वालामुखातून निघणाऱ्या राखेमुळे ज्यांच्या घरांची हानी झाली होती त्यांना यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्यांनी मदत केली.

मोझंबिक: या ठिकाणी पडलेल्या दुष्काळामुळे १,००० पेक्षा अधिक लोकांना अन्नसामग्री पाठवण्यात आली.

नायजेरिया: बस अपघातात जखमी झालेल्या अनेक साक्षीदारांना आर्थिक मदत पुरवण्यात आली. देशाच्या उत्तरेकडे उसळलेल्या वांशिक धार्मिक चकमकींत बेघर झालेल्या अनेकांना मदत पुरवण्यात आली.

बेनिन: पुरग्रस्तांसाठी औषधे, कपडालत्ता, मच्छरदाण्या, पिण्याचे स्वच्छ पाणी पुरवण्यात आले तसेच त्यांच्या राहण्याचीदेखील व्यवस्था करण्यात आली.

डोमिनिकन प्रजासत्ताक

डोमिनिकन प्रजासत्ताक: आयरिन वादळानंतर स्थानिक मंडळ्यांनी, तेथील लोकांना घरांच्या डागडुजीसाठी व बांधकामासाठी लागणारे साहित्य देऊन मदत केली.

इथियोपिया: दोन ठिकाणी पडलेल्या दुष्काळामुळे व एक ठिकाणी आलेल्या पुरामुळे ज्यांना या विपत्तीचा त्रास सहन करावा लागला होता त्यांना मदत करण्यासाठी निधी पाठवण्यात आला.

केनिया: दुष्कळग्रस्तांना मदत करण्यासाठी निधी पाठवण्यात आला.

मलावी: झालेका निर्वासित छावणीत राहत असलेल्यांना मदत देण्यात आली.

नेपाळ: दरड कोसळल्यामुळे एका साक्षीदार बहिणीचे घर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. तिला एक तात्पुरते घर बांधून देण्यात आले आणि स्थानिक मंडळीने तिला मदत केली.

पापुआ न्यू गिनी: काही लोकांनी साक्षीदारांच्या आठ घरांना मुद्दामहून आग लावली. ही घरे पुन्हा उभी करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली.

रुमानिया: काही साक्षीदारांची घरे पुरात वाहून गेली. त्यांना आपली घरे पुन्हा उभी करण्यासाठी मदत पुरवण्यात आली.

माली: दुष्काळ पडल्यामुळे व्यवस्थित कापणी झाली नाही आणि यामुळे काहींजवळ अन्न नसल्यामुळे शेजारच्या सेनेगेलहून त्यांना निधी पाठवण्यात आला.

सिएरा लियोन: युद्धग्रस्त भागांत राहणाऱ्या यहोवाच्या साक्षीदारांना फ्रान्सहून आलेल्या साक्षीदार डॉक्टरांनी वैद्यकीय मदत पुरवली.

थायलंड: अनेक प्रांतात आलेल्या पुरामुळे पुष्कळ हानी झाली. मदत कार्य करण्यासाठी आलेल्या गटांनी, १०० घरांची व ६ राज्य सभागृहांची डागडुजी करून ती स्वच्छ करून दिली.

झेक प्रजासत्ताक: झेक प्रजासत्ताकात आलेल्या पुरामुळे अनेक घरांची हानी झाली. जवळच्या स्लोवाकियातील साक्षीदारांनी मदत कार्यात भाग घेतला.

श्रीलंका: सुनामीनंतर तेथे जे विपत्ती मदत कार्य चालले होते ते संपले.

सुदान: देशात चाललेल्या युद्धामुळे अनेक यहोवाच्या साक्षीदारांना त्यांची घरे सोडून दुसरीकडे पळून जावे लागले होते. यांच्यासाठी मग अन्न, कपडालत्ता, बूट व प्लॅस्टिक शीट्स पाठवण्यात आल्या.

टांझानिया: एका मोठ्या पुरामुळे १४ कुटुंबांचे सर्व सामानसुमान वाहून गेले. त्या भागातील साक्षीदारांनी कपडे आणि घरगुती वस्तु त्यांच्यासाठी पाठवल्या. एक घर पुन्हा बांधण्यात आले.

झिंबाब्वे: देशातील एका भागात पडलेल्या दुष्काळामुळे लोकांची उपासमार होत होती. त्यांच्यासाठी अन्न व निधी पाठवण्यात आला.

बुरूंडी: निर्वासितांना वेगवेगळ्या गोष्टींची मदत व वैद्यकीय साहाय्य पुरवण्यात येत आहे.