यहोवाच्या साक्षीदारांचं या वर्षाच्या तीन दिवसांच्या अधिवेशनासाठी आम्ही तुम्हाला आमंत्रित करत आहोत.

ठळक वैशिष्ट्यं

  • भाषणं आणि मुलाखती: आज आणि भविष्यात येणाऱ्‍या समस्यांचा धैर्याने सामना करण्यासाठी व्यावहारिक मार्ग शिकून घ्या.

  • व्हिडिओ आणि चित्रं: माणसं तसंच प्राणीही आपल्याला धैर्य दाखवण्याबद्दल काय शिकवतात ते पाहा.

  • बायबल आधारित जन भाषण: येशूने दुःखात असलेल्या एका पित्याला “भिऊ नकोस” असं का म्हटलं, हे जाणून घ्या. (मार्क ५:३६) “पुनरुत्थानाच्या आशेमुळे आपल्याला धैर्य कसं मिळतं?” या विषयावर असलेलं बायबल-आधारित जाहीर भाषण रविवारी सकाळी ऐका.

  • व्हिडिओ नाटक: योना दिलेल्या नेमणुकीला घाबरून का पळून गेला, हे रविवारी दुपारी दाखवल्या जाणाऱ्‍या व्हिडिओ नाटकात पाहा.

कोण उपस्थित राहू शकतात?

सर्व जण. प्रवेश विनामूल्य आहे आणि दानपात्र फिरवले जाणार नाही.

संपूर्ण कार्यक्रमाचा आराखडाअधिवेशनांबद्दल असणारा व्हिडिओपाहा.